हैदराबाद - देशात मंगळवारी 18 हजार 522 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. या नव्या रुग्णांसह एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 5 लाख 66 हजार 840 वर पोहोचला आहे. देशात आज दिवसभरात 418 रुग्णांचा मृत्यू झाला. या संख्येसह कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 16 हजार 893 इतकी झाली आहे. देशात 2 लाख 15 हजार 125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 34 हजार 821 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
दिल्ली -
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. यामुळे कॉमनवेल्थ गेम्स विलेजमध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू केले आहे. या सेंटरची क्षमता 600 बेडची असणार आहे. हे सेंटर डॉक्टर फॉर यू या ग्रुपकडून चालवण्यात येणार आहे. याविषयी डीएफवायचे चेअरमन रजन जैन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, या सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने रुग्णांचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. पुढील आठवडाभरात 100 ते 150 बेडची व्यवस्था पूर्ण होईल.
----------------------------------------
मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 'किल कोरोना' या कॅपेनची सुरूवात मध्य प्रदेश सरकारने केली आहे. ही कॅपेन पुढील 15 दिवस राबवली जाणार असून यात 2.5 लाख टेस्ट केले जाणार आहेत. दररोज 15 हजार ते 20 हजार सॅपल यात तपासणीचे उद्दिष्ट आहे. हे कॅपेन डोअर टू डोअर सर्वे या पद्धतीने केले जाणार आहे.
----------------------------------------
उत्तर प्रदेश -
मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय दिवसभरात राज्यात 664 नवे रुग्ण आढळून आले. या नव्या रुग्णांसह एकूण रुग्ण संख्या 23 हजार 492 झाली आहे. राज्यात 697 रुग्णांचा मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत 6 हजार 711 रुग्णावर उपचार सुरू आहेत. 16 हजार 84 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण 68.46 टक्के इतके आहे.
----------------------------------------
झारखंड -
WABCO इंडिया लिमिटेडने सरायकेला जिल्ह्यात मोबाइल कोविड-19 चाचणी व्हॅन तयार केली आहे. या लॅबमध्ये 30 मिनिटांत कोरोनाचा रिपोर्ट दिला जात आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे विकसित केले गेले आहे.
----------------------------------------
बिहार -
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मेडिकल मालक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे पटणामध्ये पुढील तीन दिवस मेडिकल शॉप बंद ठेवण्यात येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
----------------------------------------
उत्तराखंड -
मंगळवारी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 51 नवे रुग्ण आढळले, या नव्या रुग्णासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 881 झाली आहे.
यात 2 हजार 258 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
----------------------------------------