ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारत कोरोना बातमी

इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोना वर मात करत आहेत. देशभरात सध्या 1,53,178 अ‌ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1,80,012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाशी झुज देताना 9900 जणांना जीव गमवावा लागला आहे.

covid-19-news-from-across-the-nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी.
author img

By

Published : Jun 17, 2020, 6:09 AM IST

हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. मात्र, यात एक दिलासादायक बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोना वर मात करत आहेत. देशभरात सध्या 1,53,178 अ‌ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1,80,012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाशी झुंज देताना 9900 जणांना जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना व्हायरच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कोरोनामुळे मृत्य झालेल्या रुग्णांची संख्या लपवल्याचा आरोप केला आहे. सुमारे 950 मृत्यू सरकारने लपवले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दिल्ली

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यात राज्यातील कोरोनाव्हायरस संकटावर चर्चा करण्यात आली. यावेळी दिल्ली सरकारच्या सर्व रुग्णालयांच्या क्षमतेचे आकलन करण्यासाठी एक टीम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तीन पथक तयार केले गेले आहेत, जे वेगवेगळ्या रुग्णालयांची तपासणी करतील. या पथकांमध्ये समाविष्ट असलेल्या एम्स आणि डीजीएचएसच्या डॉक्टरांना त्यांच्या संस्थेशी संबंधित इतर डॉक्टरांची मदत घेण्याचा अधिकार असणार आहे.

गुजरात

कोरोनाच्या संकटामुळे 47 वर्षानंतर प्रथमच राजकोट महानगरपालिका जनरल बोर्डाची बैठक एका सभागृहात घेण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी सरकारने आरोग्यासाठीचा खर्च कमी केला असल्याचा आरोप केला. गेल्या एका महिन्यापासून गुजरातमध्ये दररोज सरासरी 400 रुग्ण आढळत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच कोरोनाची खासगी प्रयोगशाळांच्या चाचणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत प्रश्न केला.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशात महाविद्यालयीन परीक्षा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. शिक्षण सचिवांनी याबाबत एचपीयूला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था, थर्मल स्क्रीनिंग आणि हात स्वच्छतेसह सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना एचपीयू व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. परीक्षांची तयारी पाहता राज्यातील क्वारंटाईन सेंटर बनलेली महाविद्यालये रिकामी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सचिवालय केंद्रांवर लोकांच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर इतर कोणत्याही व्यक्तीची नेमणूक न करण्याच्या सूचना शिक्षण सचिवांनी सर्व उपायुक्तांना दिल्या आहेत.

कर्नाटक

विधान सौधा येथील अन्न विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन कार्यालये सील करण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यापैकी एक महिला ही स्टेनोग्राफर म्हणून काम करते.

ओडिशा

कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी डोअर टू डोर तपासणी सुरू झाली आहे. शहरी भागातील 103 आणि 53,845 गावभागातील तसेच झोपडपट्ट्यांमध्ये ही तपासणी होणार आहे. 16 जून ते 31 जुलै दरम्यान आशा आणि एएनएम कामगारामार्फत ही तपसणी केली जाणार आहे. दरम्यान, ओडिशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 4163 वर पोहोचली आहे.

बिहार

मंगळवारी बिहारमध्ये 74 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6736 वर पोहोचली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत एक लाख तीस हजार जणांची चाचणी झाली. त्यापैकी 6736 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. तर 4571 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता रॅपीड चाचणी होणार आहे. याद्वारे अवघ्या 15 मिनिटांत अहवाल मिळतो. आयसीएमआरने याला मान्यता दिली आहे.

पंजाब

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपण राबवत असलेलेल्या मॉडेलचे इतर राज्यांनी अवलंबन करावे असा सल्ला दिली. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घातलेच पाहिजे, असे सरकारने सांगितले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याने पंजाबमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. सद्यस्थितीत राज्यात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 75 टक्के नोंदविण्यात आला असून तो देशात सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यात तब्बल 9794 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील 100 पैकी 75 रुग्ण बरे होतात.

उत्तर प्रदेश

राज्यात आत्तापर्यंत 435 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 14,598 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार ललाई यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अलाहाबादचे एसएसपी सत्यार्थ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर कानपूरमध्ये 17 जण कोरोनाबाधित आढळले असून त्यातील एकाच कुटुंबातील 10 जण आहेत.

उत्तराखंड

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एम्स रिषिकेशमध्ये दाखल असलेले कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज आणि त्यांची पत्नी अमृता रावत यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

छत्तीसगड

रायपूरच्या क्वारंटाईन केंद्रात वेळेवर अन्न व औषध मिळत नसल्याचा आरोप एका गर्भवती महिलेने ईटीव्ही भारतशी बोलताना केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टी.एस. सिंग देव यांनी त्या महिलेशी बातचित केली. आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून सर्व सुविधा वेळेत देण्यात याव्यात अशा सूचना दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.