त्रिचूर - यंदा त्रिचूर पोरम दिनावर भगवान वडक्कमनाथन यांची भूमी शांत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर येथे कुठलाही उत्सव साजरा केला जाणार नाही.
त्रिचूर पोरम हा केरळमधील प्रसिद्ध उत्सव आहे. हा उत्सव आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. थेक्कींनाडू मैदानात उत्सवात सहभागी होण्यासाठी गर्दी करणारी जनता यावर्षी मनातल्या मनात आणि त्या मैदानावर आणि उत्सव साध्या पद्धतीने घरात साजरा करत आहेत.
त्रिचूर शहर यावर्षी पोरम दिनी शांत असणार आहे. लॉकडाऊनमुळे भाविकांशिवाय आणि कुठलाही सोहळा न करता साध्या पद्धतीने मंदिरातील विधी पार पाडले गेले आहेत.
दरवर्षी पोरम उत्सवासाठी एक महिना आधीपासून तयारीला सुरुवात होते. मंदिरे सजवण्यापासून तर उत्सवातील नृत्य सादर करणाऱ्या कलाकारापर्यंत सगळे उत्साहाने तयारीला लागले असतात. मात्र, यावर्षी सगळे शांत आहे.