हैदराबाद- कोरोनामुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था डुबण्याच्या मार्गावर आहे. त्याचे सुरुवातीचे लक्षण दिसायला लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने आणि उद्योग सोडून इतर सर्व उद्योग बंद आहे. त्यामुळे, ऑस्ट्रेलियात शिक्षणासोबतच पार्ट टाईम जॉब करणारे विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत.
ऑस्ट्रेलियात जवळपास १.२ लाख तेलगू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी बरेच विद्यार्थी आतिथ्य व्यवसायात पार्ट टाईम नोकरी करत आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला खीळ बसली आहे. त्यामुळे, हजारो विद्यार्थी बेरोजगार झाले असून त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल आहे. या काळात फक्त सुपरमार्केट आणि पेट्रोल पंप सुरू असल्याने येथे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांजवळच रोजगार आहे. त्यामुळे, गरजू विद्यार्थ्यांना आम्ही अत्यावश्यक सुविधा पुरवत असल्याचे यंग लिबरल मल्टिकल्चरल असोसिएशन अँड को-ऑर्डिनेटर ऑफ एनआरआय स्टुडेंटचे अध्यक्ष आर. सिवा रेड्डी यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणू नियंत्रणात असून काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्यावर विदेशी विद्यार्थ्यांनी देशातून निघून जावे, असे ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितले आहे. यात फक्त त्याच विदेशी नागरिकांना सुट देण्यात आली आहे ज्यांच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व आहे. याप्रकरणी आम्ही देशातील भारतीय उच्चायुक्तालयाला संपर्क साधला असून त्यांनी आम्हाल सकारात्मक उत्तर दिले आहे. उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मदत मिळवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालयाच्या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे सांगितले आहे. तसेच, जे विद्यार्थी कायदेशीररित्या १ वर्ष व त्यापेक्षा जस्त कालावधीपासून देशात काम करत आहेत, त्यांना शासनाने निवृत्ती वेतन देण्यास मंजुरी दिली आहे, असे देखील आर. सिवा रेड्डी यांनी सांगितले.
https://www.hcicanberra.gov.in/register.
किर्गिझस्तान मध्ये अडकलेत १५०० तेलगू विद्यार्थी
ऑस्ट्रेलिया बरोबरच किर्गिझस्तानमध्ये देखील तेलगू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. किर्गिझस्तान मध्ये १५ हजार भारतीय वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यातील १५०० तेलगू विद्यार्थी हे देशाची राजधानी बिश्केक येथील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी त्यांच्या रूममध्येच अडकले आहेत. देशातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे हे विद्यार्थी धास्तावले आहेत.
परिस्थिती कधीही हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी तातडीने आम्हा विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती विद्यार्थी समन्वयक मोहन याने केली आहे.