हैदराबाद - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ३७ हजार ३३६ झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार २ मे सकाळी ८ वाजेपर्यंत देशात १ हजार २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरात १ हजार ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर त्याखालोखाल गुजरात राज्यामध्ये ४ हजार ७२१ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यवार कोरोनाची अद्ययावत आकडेवारी