नवी दिल्ली - भारतात रविवारी 62 हजार 64 नवे कोरोनाबाधित आढळल्याने रुग्णसंख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आणखी 1007 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात एकूण 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 22 लाख 15 हजार 75 वर पोहोचली आहे. देशात सध्या 6 लाख 34 हजार 945 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 15 लाख 35 हजार 744 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये 1 लाख 45 हजार 865 सक्रिय रुग्ण असून 17 हजार 757 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, नवी दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.
भारतातील कोरोना रुग्णसंख्या 22 लाखांवर पोहोचली असली तरी बरे होण्याचा दर 69.33 एवढा आहे. 4 लाख 77 हजार 23 नमुन्यांची तपासणी रविवारी करण्यात आली, अशी माहिती आयसीएमआरने दिली.