ETV Bharat / bharat

कोरोनामुळे युवकांचे भविष्य अंधारात....'७० टक्के युवकांच्या शिक्षणावर परिणाम'

author img

By

Published : Aug 12, 2020, 9:06 PM IST

महामारीमुळे युवकांना अनेक धक्के बसत आहेत. या परिस्थिमुळे तरुणांच्या भविष्यातील नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षणात अडथळे येत असल्याने त्याचा युवकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक गुये रायडर यांनी सांगितले.

file pic
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद - कोरोनामुळे जगभरातील तरुणांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणावर विपरित परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर ७० टक्के युवकांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. सर्वच युवकांना ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा नसल्याने भविष्यातील त्यांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

युवक आणि कोरोना, असे या अहवालाचे नाव आहे. रोजगार, शिक्षण, युवकांचे हक्क आणि मानसिक स्वास्थ्य अशा पैलूंचा अहवालात अभ्यास करण्यात आला आहे. महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था बंद झाल्याने ७० टक्के युवकांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. उच्च उत्पन्न गटातील देशांपेक्षा कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये याचा सर्वात जास्त परिणाम झाल्याचे अहवालात म्हटले आहे. कारण, कमी उत्पन्न असलेल्या देशातील तरुणांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेले इंटरनेट, मोबाईल, कॉप्युटर यासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. अभ्यास करण्यासाठी अनेकांच्या घरामध्ये पुरेशी जागाही उपलब्ध नाही, असे अहवालात म्हटले आहे.

'महामारीमुळे युवकांना अनेक धक्के बसत आहेत. या परिस्थिमुळे तरुणांच्या भविष्यातील नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षणात अडथळे येत असल्याने त्याचा युवकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक गुये रायडर यांनी सांगितले'.

तंत्रज्ञान उपलब्ध असण्यातील तफावत आताच्या परिस्थितीत दिसून येत आहे. उच्च उत्पन्न गटातील ६५ टक्के युवकांना ऑनलाईन व्हिडिओद्वारे शिकण्याची संधी मिळत आहे. याच्या विपरीत कमी उत्पन्न गटातील १८ टक्के युवकांनाच ऑनलाईन शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. कोरोना काळात तरुण आपली उर्जा दुसऱ्या कामातही खर्च करत आहेत. एका अहवालानुसार चारपैकी एका तरुणाने कोरोना काळात स्वयंसेवकाचे काम केले आहे.

कोरोनाला सर्वसमावेशक प्रतिसाद देण्यासाठी तरुणांचे मत ऐकून घ्यायला हवे. निर्णय प्रक्रियेत युवकांना सहभाग दिला जावा, त्यामुळे त्यांना आपल्या गरजा स्पष्टपणे समजून येतील. तसेच यामुळे सरकारी नियोजन आणि धोरणात सहभाग घेण्याची संधी युवकांना मिळेल. कोरोनामुळे युवकांच्या रोजगाराच्या संधी जात आहेत. या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात धोरण असावे, असे अहवालात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.