नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला आहे. मात्र, अजूनही शहरात तब्बल ८०३ कन्टेन्मेंट झोन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मागील दहा दिवसांमध्ये या यादीत २४३ झोनची भर पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, २८ ऑगस्टपर्यंत दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ३२१ कन्टेन्मेंट झोन आहेत. तर दिल्ली पश्चिम जिल्ह्यात २६६ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्याखालोखाल इतर पाच जिल्ह्यांत १०० पेक्षा जास्त कंन्टेन्मेंट झोन आहेत.
आणखी कन्टेन्मेंट झोन वाढण्याची शक्यता
येत्या काही दिवसांत कंन्टेन्मेट झोन वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या भागात लॉकडाऊन असतानाही अनेक गोष्टींना सुट देण्यात आली आहे. तसेच चाचण्या दुपटीने वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.