अहमदाबाद - गुजरातमध्ये गुरुवारी एकूण ३१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३९५ वर पोहोचली आहे. तसेच गुरुवारी १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २१४ वर पोहोचली आहे.
एकूण अॅक्टीव्ह केसेस ३ हजार ५६८ असून त्यापैकी ३ हजार ५३५ जणांची प्रकृती चांगली आहे, तर ३३ जणांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या ८ दिवसांचा आकडा बघितल्यास दररोज सरासरी १९० कोरोनाबाधितांची भर पडत आहे. गेल्या २२ एप्रिलला १ हजार ५०१ रुग्ण होते. मात्र, ८ दिवसात रुग्ण दुप्पट झाले आहेत. यासोबतच मृतांची संख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सापडलेल्या रुग्णांपैकी २४९ रुग्ण अहमदाबाद, वडोदरामध्ये १९, सुरत १३, गांधीनगर, पंचमहाल १०, भवनगर ४, मेहसाना ३, अरवली आणि दाहोद प्रत्येकी १ याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गुरुवारी ८६ रुग्णांना डिस्चार्ज -
काल एकूण ८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदाबाद ५३, सुरत १४, महीसागर ५, भारुच ४, माहेसाना व बानसकांथा प्रत्येकी ३ आि आनंद, पंचमहाल, राजकोट प्रत्येकी १ डिस्चार्ज दिला.