नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात कोरोवाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या काळात देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे इंडियन चेस्ट सोसायटीने (आयसीएस) त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
कोरोना व्हायरसने सध्या जगभरात लाखो लोकांचा बळी घेतल आहे. भारतातही मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा पसार कमी होण्यास नक्की मदत होईल, अशी आशाही आयसीएसने व्यक्त केली आहे. तसेच 1919 साली आलेल्या स्पॅनिश व्हायरसवेळीही अशीच परिस्थिती उद्भवल्याचेही आयसीएसचा दावा आहे.