देशात 3 लाख 22 हजार रुग्णांवर उपचार सुरू; तर मृत्यू दर 1.45 वर - कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी
देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95.31 वर पोहचला आहे. आतापर्यंत 94 लाख 89 हजार 740 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृत्यू दर 1.45 आहे. याचबरोबर देशातील विविध रुग्णालयामध्ये 3 लाख 22 हजार 366 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांनी 99 लाखाचा आकडा पार पडला आहे. गेल्या 24 तासामध्ये 24 हजार 10 रुग्णांची नोंद झाली असून 355 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 99 लाख 56 हजार 557 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 44 हजार 451 जणांचा बळी गेला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता सर्वांत जास्त मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत.
देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95.31 वर पोहचला आहे. आतापर्यंत 94 लाख 89 हजार 740 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृत्यू दर 1.45 आहे. याचबरोबर देशातील विविध रुग्णालयामध्ये 3 लाख 22 हजार 366 रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त मृत्यू -
आज सकाळी आठ वाजेपर्यंत मृत्यू झालेल्या 355 रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील 95, दिल्ली 32, पश्चिम बंगालमध्ये 46, केरळमध्ये 27 रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त 48 हजार 434 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये मृत्यू दर जास्त आहे. याचबरोबर बुधवारी दिवसभरात 11 लाख 58 हजार 960 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 15 कोटी 78 लाख 5 हजार 240 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात -
ब्रिटन पाठोपाठ आता अमेरिकेत देखील कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी अमेरिकेत प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिली. यासोबत त्यांनी जगाचे अभिनंदन देखील केले. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या अमेरिकेत फायजरच्या लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. दरम्यान, भारतातही फायझर- बायोएनटेक या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन : सिंघु बॉर्डरवर पंजाबमधील शेतकऱ्याचा ड्रेनमध्ये पडल्याने मृत्यू