ETV Bharat / bharat

कोळसा घोटाळा : माजी केंद्रीय मंत्र्याला तीन वर्षांची कैद

author img

By

Published : Oct 26, 2020, 11:26 AM IST

याप्रकरणी सहा ऑक्टोबरला विशेष न्यायमूर्ती भारत पराशर यांनी वाजपेयी सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री (कोळसा) दिलीप रे यांच्यासह इतर आरोपी कोळसा घोटाळा प्रकरणात दोषी असल्याचा निकाल दिला होता.

Three-year jail for ex Union Minister convicted in coal scam
कोळसा घोटाळा : माजी केंद्रीय मंत्र्याला तीन वर्षांची कैद

नवी दिल्ली : १९९९च्या झारखंड कोळसा घोटाळ्यामध्ये एका माजी केंद्रीय मंत्र्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी याबाबत निर्णय दिला. माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासोबत अन्य दोषींना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी सहा ऑक्टोबरला विशेष न्यायमूर्ती भारत पराशर यांनी वाजपेयी सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री (कोळसा) दिलीप रे यांच्यासह इतर आरोपी कोळसा घोटाळा प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय दिला होता. दिलीप यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल होते.

दोन वरिष्ठ अधिकारीही दोषी..

याप्रकरणी न्यायालयाने तत्कालीन कोळसा मंत्रालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवले आहे. यासोबतच, कॅस्ट्रोन टेक्नॉलॉजीचे प्रदीप कुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम; आणि कंपनीचे संचालक महेंद्र कुमार यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.