ETV Bharat / bharat

मथुरेत दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एका दाम्पत्याला घरात जिंवत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गोविंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या महाविद्या कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी पती पत्नी घरात झोपले असतांना घराला बाहेरून कडी लावून आग लावण्यात आली.

mathura latest news
दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Oct 26, 2020, 6:23 PM IST

मथुरा - उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एका दाम्पत्याला घरात जिंवत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गोविंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या महाविद्या कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी पती पत्नी घरात झोपले असतांना घराला बाहेरून कडी लावून आग लावण्यात आली. दरम्यान आरडाओरड झाल्याने परिसरातील लोकांनी घराची कडी उघडून त्यांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

संगीत चौरसिया आणि त्यांची पत्नी सावित्री चौरसिया असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान चौरसिया यांच्या मुलीचा विवाह ठरला होता. मात्र तुमच्या मुलीचे माझ्याशीच लग्न लावून द्या, अन्यथा परिणाम वाईट होतील असा सारखा धमकीचा फोन त्यांना येत होता. त्यानंतर आज सकाळी ही घटना घडली. या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.