नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विसकळीत झालेच आहे. मात्र, विविध घटकांवरही याचे परिणाम झाले आहेत. देशभरातील कोरोनासंबंधीच्या ताज्या बातम्या जाणून घ्या एका क्लिक वर...
- कोरोना दहशत : 25 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 8 जण झाले बरे
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 8 जण बरे झाले असून आपल्या घरी परतले आहेत.
- तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णाची संख्या 6 वर
हैदराबाद - तामिळनाडूमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 6 वर पोहचली आहे. तामिळनाडू सरकारने कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्याची सीमा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
- कोरोना दहशत : राजस्थान सरकारने केली हरियाणा सीमा बंद
जयपूर - राजस्थान सरकारने कोरोनाचा प्रभाव पाहता हरियाणा सीमा बंद केली आहे. फक्त अत्यवश्यक कार्य असल्यास राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
- देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 298 वर
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 298 वर पोहचली आहे. त्यामध्ये 22 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 4 भारतीय नागरिकांचा आणि एका विदेशी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- मुंबई-दिल्लीतून रेल्वे प्रवास केलेले १२ प्रवासी सापडले कोरोना 'पॉझिटीव्ह'
नवी दिल्ली - रेल्वेमधून प्रवास केलेल्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. १३ मार्चला दिल्ली ते रामगुंडमपर्यंत धावलेल्या एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई-जबलपूर मार्गावर १६ मार्चला धावलेल्या गोदान एक्सप्रेस रेल्वेच्या बी-१ डब्यातील ४ प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात ते दुबईहून भारतात आले होते. सर्व संबंधितांना आवश्यक कारवाई करण्यासाठी सतर्क केले आहे.
- महाराष्ट्रासह लडाख, कर्नाटकात कोरोनाचे आणखी रुग्ण, देशाभरात २७५ जणांना बाधा
नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना संसर्ग झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतामध्ये २७५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळपासून २७ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लडाख ३, महाराष्ट्र ११, कर्नाटक १, पश्चिम बंगाल १, दिल्ली/नोयडा १, हरियाणात १ रुग्ण आढळून आला आहे.
- कोरोनाचे संकट: उत्तरप्रदेशात 'जनता कर्फ्यू'साठी कडेकोट व्यवस्था
लखनौ - देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशातील योगी सरकारने कडेकोट बंद पाळण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या ३५ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
- 'कोरोनाचं संकट टळेपर्यंत ३ महिन्यांसाठी सीएए, एनपीआर रद्द करा'
नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांना घरात राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तर प्रशासकीय पातळीवर कोरोनाशी लढा देण्याचे काम सुरू आहे. अशा वातावरणात सीएए, एनपीआर, तीन महिन्यांसाठी रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केली आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा यावर काय करायचे त्यावर चर्चा करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
- कोरोना: ..तर संपावर जाऊ, पाकिस्तानमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा सामना करताना पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणांचा तुटवडा भासत आहे. सरकारने सुरक्षा उपकरणे पुरवली नाही तर संपावर जाण्याचा इशारा सरकारी रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी दिला आहे
- CORONA VIRUS : 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख 31 मार्चनंतर
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे 'इयत्ता दहावीचा परीक्षेचा सोमवार, दि. 23 मार्च रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली
- मुंबई-दिल्लीतून रेल्वे प्रवास केलेले १२ प्रवासी सापडले कोरोना 'पॉझिटीव्ह'
नवी दिल्ली - रेल्वेमधून प्रवास केलेल्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. १३ मार्चला दिल्ली ते रामगुंडमपर्यंत धावलेल्या एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई-जबलपूर मार्गावर १६ मार्चला धावलेल्या गोदान एक्सप्रेस रेल्वेच्या बी-१ डब्यातील ४ प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात ते दुबईहून भारतात आले होते. सर्व संबंधितांना आवश्यक कारवाई करण्यासाठी सतर्क केले आहे.
- कोरोना परिणाम : दुकाने, मॉल बंद झाल्याने ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण
नवी दिल्ली - कोरोना प्रसार वाढत असल्याने दैनंदिन वस्तूंसाठी ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने प्रयत्न सुरू केले आहेत.
- दिलासादायक! कंपन्यांनी साबणांच्या किमती कमी करून वाढविले उत्पादन
नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढत असताना वैयक्तिक स्वच्छतेच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. असे असले तरी हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज आणि पतंजली कंपनीने साबणासह इतर स्वच्छतेच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. तसेच मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादनही वाढविले आहे.