ETV Bharat / bharat

हरियाणामध्ये कोरोना संभाव्य रुग्णाची आत्महत्या... - कोरोना संभाव्य रुग्णांची आत्महत्या

30 वर्षीय कोरोना संभाव्य रुग्णाने शासकीय रुग्णालयाच्या तीसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याला क्षयरोगही होता. काही दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. मात्र, चाचणीचा अहवाल येणे बाकी होता. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Coronavirus suspect jumps to death at Panchkula hospital in Haryana

author img

By

Published : Apr 30, 2020, 10:53 AM IST

चंदिगड - देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुळे देशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हरियाणामधील पंचकुला येथे एका कोरोना संभाव्य रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

30 वर्षीय कोरोना संभाव्य रुग्णाने शासकीय रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याला क्षयरोगही होता. काही दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. मात्र, चाचणीचा अहवाल येणे बाकी होता. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान गेल्या महिन्यामध्ये एक 55 वर्षीय कोरोना संभाव्य रुग्ण कर्नल कल्पना चावला वैद्यकीय कॉलेजमध्ये दाखल करण्यात आला होता. त्याने रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर आलेला चाचणी अहवाल निगेटिव्ह होता

दरम्यान, कोरोना संशयित रुग्णालयातून पळाले, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, या सारख्या अनेक घटना घडल्याचे संपूर्ण देशातून पुढे येत आहे. यातून कोरोनाबाबत जनजागृती होत असताना देखील देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.