ETV Bharat / bharat

जैसलमेरमध्ये आणण्यात आलेले इराणमधील सर्व भारतीय कोरोना 'निगेटिव्ह'! - इराण भारतीय कोरोना निगेटिव्ह

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी काही भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशी आणण्यात आले होते. यांपेैकी एकूण ४८४ नागरिकांना राजस्थानमधील जैसलमेर येथे उतरवण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

484 Indians report negative, those who were airlifted from Iran and brought to Jaisalmer
जैसलमेरमध्ये आणण्यात आलेले इराणमधील सर्व भारतीय कोरोना 'निगेटिव्ह'!
author img

By

Published : Mar 23, 2020, 1:07 PM IST

जयपूर - इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी काही भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशी आणण्यात आले होते. यांपेैकी एकूण ४८४ नागरिकांना राजस्थानमधील जैसलमेर येथे उतरवण्यात आले होते. या सर्व भारतीयांची जैसलमेरमधील लष्करी तळावर तपासणी करण्यात येत होती, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जैसलमेरमध्ये आणण्यात आलेले इराणमधील सर्व भारतीय कोरोना 'निगेटिव्ह'!

या सर्वांच्या तपासणीचे अहवाल सोमवारी आले. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असले, तरी खबरदारी म्हणून सर्वांना १४ दिवस तेथेच विशेष कक्षामध्ये रहावे लागणार आहे. हे सर्व नागरिक लष्करी तळावरील तपासणी केंद्रावर असलेल्या सुविधांनी समाधानी असल्याची माहितीही समोर आली आहे.

यापूर्वीही इराणमधूनही भारतीयांना केले एअरलिफ्ट..

याआधी इराणमधील १९५ नागरिकांनाही एअरलिफ्ट करून जैसलमेरला आणण्यात आले होते. याठिकाणी जैसलमेर विमानतळावर त्यांची विशेष तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर सर्व नागरिकांना वेलनेस सेंटरवर नेण्यात आले. भारतीय लष्कराने केवळ एका महिन्यातच जैसलमेरमध्ये तब्बल एक हजारांहून अधिक बेड असलेले तपासणी केंद्र उभारले आहे.

हेही वाचा : ..अन् मोदी संतापले! म्हणाले, नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.