हरियाणा- गुरुग्राम जिल्ह्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी सरकार व प्रशासनाच्या यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुग्राम सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 2 परिचारिकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली. आणि या दोन्ही परिचारिकांवर गुरुग्राममधील सेक्टर -9 ईएसआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसाला संसर्ग
वॉर्डात सुविधा नसल्याचा आरोप
आयसोलेशन वॉर्डात भर्ती असलेल्या एका परिचारिकाने जिल्हा प्रशासनावर व्हिडिओ बनवून गंभीर आरोप केले आहेत. अडीच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये कोरोनामुळे त्रस्त नर्सने आयसोलेशन वॉर्डमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना केली आहे.