ETV Bharat / bharat

जाणून घ्या जगभरात काय आहे लॉकडाऊनची स्थिती - जगभरात कोरोना लॉकडाऊन

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आता काही प्रमाणात लॉकडाऊन कमी करण्याचा विचार होत आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.

Corona Lockdown
कोरोना लॉकडाऊन
author img

By

Published : May 13, 2020, 1:14 PM IST

हैदराबाद - केंद्र शासनाने देशातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवला आहे. मात्र, यावेळी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. देशभरातील जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये विभागणी करून त्याप्रमाणे सूट देण्यात आली आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.

लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यासाठी कराव्या लागतील या गोष्टी -

१) टेस्टींग(चाचणी) - जास्त प्रमाणात नागरिकांच्या चाचण्या केल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यास मदत होऊ शकते. कारण अनेक लोकांना कोरोनाची लागण होऊनही त्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नाही. हीच लोक कोरोनाचे वाहक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे.

२) ट्रॅकिंग - कोरोना रुग्णांचा शोध घेणे हे सर्वांत मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे. अॅपल आणि गुगल यांसारख्या डिजिटल कंपन्या यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये गव्हर्नर जॉन हॉपकिन्स एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेसोबत मिळून काम करत आहेत.

३) ईम्यून(रोग प्रतिकारक क्षमता) - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरीरात रोग प्रतिकारक क्षमता असणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनाची लस बनवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी स्वत:ची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

४) नवीन सामान्य नियम - मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात स्वच्छ करणे यांची सवय लावून घेणे अतिशय गरजेचे आहे.

लॉकडाऊन उठवण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'ने तयार केलेली नियमावली -

  • कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात असावा. कोरोना रुग्ण शोधण्यात आणि उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे.
  • शाळा आणि कार्यालयांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या असाव्यात.
  • नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे, क्वॉरंटाईन राहणे यासारख्या उपायांसाठी तयार असावे.

'येथे' काढण्यात आला आहे लॉकडाऊन -

हाँगकाँगमधील ९९ टक्के नागरिक मास्कचा वापर करत आहेत. गर्दी न करता आपली कामे करत आहेत. हाँगकाँगचे मॉडेल सर्वांत प्रभावी मानले जात आहे. येथे आत्तापर्यंत १ हजार ४० कोरोनाबाधित रुग्ण होते. सध्या यातील १७७ जण उपचार घेत आहेत तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ८५९ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे येथील लॉकडाऊन हटवण्यात आला आहे.

चेक प्रजासत्ताकमध्ये ५ टप्प्यात उठवण्यात आला लॉकडाऊन -

कोरोनाने पहिला मृत्यू होण्याअगोदरच चेकमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती. सध्या येथे पाच टप्प्यात लॉकडाऊन काढण्यात येत आहे. २० एप्रिलला कृषी बाजारपेठा आणि वाहनांची खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

२७ एप्रिलपासून दुकाने, जिम सुरू करण्यात आले आहेत. हॉटेल आणि सलून मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला सुरू करण्याचा विचार शासनाचा आहे. ब्रिटन सध्या चेक प्रजासत्ताकाच्या उपाययोजनांचा अभ्यास करत आहे.

लॉकडाऊन सुरू करण्याअगोदर नागरिकांना खरेदीसाठी ४८ तासांचा वेळ देणारा चेक हा एकमेव देश आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले. पाच आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर चेकच्या पंतप्रधानांनी देशाने कोरोनाची लढाई जिंकल्याचे जाहीर केले.

भारत आणि न्यूझीलंडने एकाच दिवशी लॉकडाऊन केले होते. ३० एप्रिलपर्यंत न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे फक्त तीन रूग्ण राहिले होते तर भारतात हा आकडा दीड हजारपेक्षा जास्त होता.

'या' ठिकाणी परिस्थिती सुधारण्याअगोदरच उघडण्यात आला लॉकडाऊन -

जपानच्या होकिदेओमध्ये १९ मार्चपर्यंत कोरोनाचे ८० टक्के रुग्ण वाढले मात्र, तरीही या शहरात तीन आठवड्यांनंतर लगेच लॉकडाऊन काढण्यात आला. यामुळे नागरिक पुर्ववत बाहेर फिरू लागले. या प्रकारामुळे येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. १२ एप्रिलला येथे आणीबाणी लावण्यात आली.

जगभरात हळू-हळू उघडत आहे लॉकडाऊन -

१) कॅनडा - येथील प्रत्येक राज्याने आपापल्या आर्थिक पनर्वसनाची योजना तयार केली आहे. येथे पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात सार्वजनिक हालचालींना परवानगी देण्यात आली आहे.

२)अमेरिका - अमेरिकेत कोरोनाचे ११ लाखांपेक्षा जास्त रूग्ण आहेत. येथील ५० राज्यांपैकी २७ राज्यांमध्ये अतिशय कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. रेस्टॉरंट, ठोकमालाची दुकाने आणि सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

३) स्पेन - २ मे पर्यंत येथे २.३९ लाख रुग्ण होते तर २४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले होते. त्यानंतर नागरिकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

४) इटली - कोरोनाने सर्वात जास्त हानी झालेल्या देशांपैकी इटली एक आहे. येथे दोन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित असून २७ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. ४ मे ला येथे लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

५) इंग्लंड - ७ मे पर्यंत कडक लॉकडाऊनचे पालन करण्यात आले. त्यानंतर काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

६) जर्मनी - ३० एप्रिलला येथे अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी मिळाली असून दुकानेही सुरू करण्यात आली आहेत.

७) इराण - एप्रिलच्या मध्यातच येथे लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

८) मेक्सिको - अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने आणि शाळा मे महिन्यात बंद राहणार आहेत. मात्र, तरीही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

९) पोलंड - एप्रिलमध्ये येथील पार्क सुरू करण्यात आले आहेत. ४ मे ला हॉटेल आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

१०) फ्रान्स - २ मे पर्यंत १.६७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. तरीही काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता आहे. ११ मे ला येथील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.