इदौर - कोरोना विषाणूचा प्रसार इदौरमध्ये वेगाने होत आहे. या ठिकाणी कोरोना प्रसाराच्या विविध घटना समोर येत आहेत. बुधवारी क्वारंटाइन केलेले रुग्ण पळून गेले होते. मात्र, आज वेगळाच प्रकार समोर आला आहे. खातीपूर क्षेत्रात संदिग्ध व्यक्तिद्वारे चार चाकीतून १००, २००,५०० च्या नोटा ग्रामीण क्षेत्रात फेकल्याचे समोर आले आहे.
हीरा नगर ठाणे क्षेत्रातील खातीपूरमध्ये धर्मशाळे समोरच्या रस्त्यावर १००, २०० आणि ५०० च्या नोटा फेकून अज्ञात व्यक्ती गेली होती. जमीनीवर पडलेल्या नोटा पाहून ग्रामस्थांनी प्रशासनाला यांची माहिती दिली. ज्या नंतर प्रशासनाने लोकानी या नोटाना हात लाऊ नये अशा सुचना दिल्या होत्या. पोलीस आणि नगरपालिकेच्या पथकाने संक्रमित आहेत असे सांगितलेल्या सगळ्या नोटा ग्रामस्थांच्या मदतीने निर्जंतूक करून तपासण्यासाठी ठेऊन घेतल्या. नोटा जप्त केल्यानंतर पोलिसांनी संबंधीत ठिकाण निर्जंतूक केले. या वेळी पोलीस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे लोकानी टाळ्या वाजवून स्वागत केले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.