ETV Bharat / bharat

अतिप्रसंग करु पाहणाऱ्याची तरुणीकडून हत्या; पोलिसांनी केले निर्दोष मुक्त - तिरुवल्लूर तरुणी अतिप्रसंग हत्या

पोलीस अधीक्षक ए. अरविंदन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की या मुलीने घटना झाल्यानंतर पोलीस ठाण्यात येत आत्मसमर्पण केले होते. तपासा केल्यानंतर आम्ही तिच्यावरील कलम ३०२ (खुनाचा गुन्हा) अंतर्गत दाखल असलेला गुन्हा बदलत, कलम १०६ (स्वसुरक्षेचा हक्क) अंतर्गत हे प्रकरण घेतले आहे. या तरुणीने आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलले असल्यामुळे, तिच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

Cops save a teenage girl who stabbed and killed a youth attempted to rape
अतिप्रसंग करु पाहणाऱ्याची तरुणीकडून हत्या; पोलिसांनी केले निर्दोष मुक्त
author img

By

Published : Jan 12, 2021, 4:36 PM IST

चेन्नई : तामिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने आपल्यावर अतिप्रसंग करु पाहणाऱ्या व्यक्तीची हत्या केली होती. या तरुणीवरील खुनाचा गुन्हा मागे घेत, तिरुवल्लूर पोलिसांनी तिला निर्दोष मुक्त केले आहे. तिने जाणून नाही, तर स्व-सुरक्षेच्या दृष्टीने हे कृत्य केले होते त्यामुळे तिच्यावरील गुन्हे मागे घेतले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

काय आहे प्रकरण..?

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जानेवारीला सायंकाळच्या सुमारास ही मुलगी बाहेर गेली असता, एस. अजितकुमारने (२४) तिच्यावर हल्ला केला. त्याने तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रतिकार करत त्याला जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्याच्या हातातील चाकू खाली पडला. तरुणीने तो चाकू घेत अजितच्या मानेवर वार केले, ज्यात अजितचा मृत्यू झाला. यानंतर तरुणीने जवळच्या शोलावरम पोलीस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, अजितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले, की अजितकुमार हा तरुणीचा दूरचा नातेवाईक होता. दहावी नापास असलेला अजित बेकार आणि दारुडा होता. त्याच्या वागण्याला कंटाळून त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. अजितवर यापूर्वीचेही काही चोरीचे गुन्हे दाखल होते, तसेच तो कायम चाकू सोबत बाळगत असे. गेल्या काही दिवसांपासून अजित या तरुणीचा पाठलाग करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले होते.

कलम १०६ केले लागू..

पोलीस अधीक्षक ए. अरविंदन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की या मुलीने घटना झाल्यानंतर पोलीस ठाण्यात येत आत्मसमर्पण केले होते. तपासा केल्यानंतर आम्ही तिच्यावरील कलम ३०२ (खुनाचा गुन्हा) अंतर्गत दाखल असलेला गुन्हा बदलत, कलम १०६ (स्वसुरक्षेचा हक्क) अंतर्गत हे प्रकरण घेतले आहे. या तरुणीने आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलले असल्यामुळे, तिच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सध्या तिला सुरक्षेच्या दृष्टीने सरकारी निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

अतिप्रसंग करु पाहणाऱ्याची तरुणीकडून हत्या; पोलिसांनी केले निर्दोष मुक्त

पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत..

तिरुवल्लूर पोलिसांच्या या निर्णयाचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. महिला संघटना आणि मानवाधिकार संघटनांनीही पोलिसांचा हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. महिला कार्यकर्ता आणि वकील जे.जे.ए. नीतू यांनी या निर्णयाचे स्वागत करत, सर्वच पोलिसांनी अशा प्रकारे काम करण्याची आशा व्यक्त केली आहे. तसेच, मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात काम करत असलेले वकील के. इलांगोवन यांनीही पोलिसांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

कित्येक प्रकरणात पोलीस आरोपीला तातडीने अटक करतात, आणि त्यानंतर अटक करण्यात आलेला आरोपी कसा दोषी आहे हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने तपास करतात. मात्र, अटक करण्याची घाई न करता, योग्य तपास करुन अशा प्रकारचा निर्णय घेणारे पोलीस क्वचितच आढळतात, असेही इलांगोवन म्हणाले.

हेही वाचा : केंद्रीय कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.