रायपूर - छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील दोन पोलीस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. देशात सध्या कोरोना विषाणू थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पोलिसांनी कोरोना व्हायरसचा पोषाख परिधान केला आहे आणि या वेषात ते रस्त्यावर फिरत आहेत. कोरोना या प्राणघातक आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी हि शक्कल लढवली आहे. प्रशासनाने नागरिकांना संरक्षित राहण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ते करत आहेत.
हेही वाचा... 'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस ‘लॉकडाऊन’ लागू केला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे हे कोरोना विषाणूच्या वेषातील पोलीस सांगत आहेत.