नवी दिल्ली- जो पर्यंत योग्य निवड प्रक्रिया सुरू करून पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार नाही, तो पर्यंत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी त्यांचा कार्यकाळ पुढे सुरू ठेवतील, अशी माहिती काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी रविवारी दिली.
सोनिया गांधी यांना अंतरिम अध्यक्ष पद स्वीकारून आज वर्ष पूर्ण होत आहे. मात्र यांचा अर्थ असा नाही की तो कालावधी संपला म्हणजे पद लगेच रिक्त होईल, असे नाही, असे सिंघवी रविवारी म्हणाले.
ते म्हणाले की , अध्यक्ष निवडीची प्रक्रिया काँग्रेसच्या संविधानात लिहीली असू पक्ष त्याचे पालन करण्यास कटिबद्ध आहे. अध्यक्ष निवडीबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.
सोनिया गांधी यांच्या अंतरिम अध्यक्ष पदाचा कार्यकाळ 10 तारखेला संपत असल्याने अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला संभ्रमाबाबत बोलताना सिंघवी म्हणाले, हे खरे आहे आहे की निसर्ग असो की राजकारण अथवा राजकीय पक्ष कोणीच पोकळी सहन करत नाही,अथवा तशी परवानगी देत नाहीत.
एका रात्रीत काँग्रेस नेतृत्वहीन कशी होईल, हे शक्य नसल्याचेही सिंघवी म्हणाले.