ETV Bharat / bharat

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; 'या' नावांवर विचार सुरू - अध्यक्ष

राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. तरीही राहुल राजीनामा देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे लवकरच काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी
author img

By

Published : Jun 7, 2019, 7:36 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. तरीही राहुल राजीनामा देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे लवकरच काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील सदस्य एकापेक्षा जास्त कार्यकारी अध्यक्ष बनवण्यासाठी तयारी करत आहेत. पक्षातील सदस्यांत याबाबत विचारमंथन झाल्यानंतर काँग्रेसचे २ कार्यकारी अध्यक्ष असले पाहिजेत, यावर एकमत झाले आहे. यामधील एक दक्षिण भारतातील आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा असल्यास पक्षासाठी चांगले ठरेल, असे म्हणने मांडण्यात आले आहे.

पक्षातील सुत्रांनुसार, यासंबंधी काही नावे समोर आली आहेत. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मल्लिकार्जून खरगे यांची नावे कार्यकारी अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. याबरोबरच ज्योतिरादित्य सिंधिया यांचेही नाव युवा अध्यक्ष म्हणून आघाडीवर आहे. दुसरा कार्यकारी अध्यक्ष गांधी घराण्याचा नसणार आहे.

या पार्श्वभूमीवर पूर्व केंद्रीय मंत्री आणि हॉकी ऑलिंपिकपटू अस्लम शेर खान यांनी राहुल गांधीना पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिले, तुम्हांला नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसरा अध्यक्ष हवा असेल आणि कोणी तयार नसेल तर, मला संधी द्या. मला २ वर्षांची संधी देण्यात यावी आणि काँग्रेसला पुन्हा राष्ट्रवादाशी जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.