नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हटले होते, की निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षातील महासचिव, प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले नाही. हे सर्व दुख:द होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर अनेक राज्यांच्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधीनी युथ काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा केली होती. यावेळी, युथ काँग्रेसने राहुल गांधीना अध्यक्षपदावर कायम राहण्यासाठी अपील केले होते. परंतु, राहुल यांनी मी राजीनाम्यावर ठाम असून राजीनामा माघारी घेणार नाही, असे म्हटले होते. राहुलच्या या वक्तव्यानंतर दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, मध्यप्रदेशसोबत इतर राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सोपवला आहे.
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने दिल्लीतील सर्व २८० ब्लॉक कमिटींना बर्खास्त केल्याची माहिती शीला दिक्षित यांनी केली आहे. तर, तेलंगणा प्रदेस काँग्रेस कमिटीच्या अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सचिव वीरेंद्र राठोड, अनिल चौधरी, राजेश धर्मानी आणि वीरेंद्र वशिष्ट यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२० जणांनी सही करत राजीनामा सोपवला आहे. यामध्ये, सचिव, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राहुलच्या वक्तव्याला बरोबर ठरवले. ते म्हणाले, पराभवानंतर मी राजीनामा देण्यासाठी चर्चा केली होती. यासोबतच हरियाणाच्या महिला काँग्रेस अध्यक्ष सुमित्रा चव्हान यांनीही राजीनामा दिला आहे.