नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर हा उणे २३.९ टक्के झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक संकटात सापडल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून देत चिमटा काढला आहे.
-
GDP : Minus 23.9%
— Kapil Sibal (@KapilSibal) September 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मोदी जी क्या आपको याद है :
अच्छे दिन
सब का साथ सब का विकास
आपने कांग्रेस को साठ साल दिये मुझे सिर्फ़ साठ महीने दो
पकोड़े तलने का वक्त आ गया है
वो भी नहीं बिकेंगे !
सिर्फ़ भाषण
ज़ीरो शासन
">GDP : Minus 23.9%
— Kapil Sibal (@KapilSibal) September 1, 2020
मोदी जी क्या आपको याद है :
अच्छे दिन
सब का साथ सब का विकास
आपने कांग्रेस को साठ साल दिये मुझे सिर्फ़ साठ महीने दो
पकोड़े तलने का वक्त आ गया है
वो भी नहीं बिकेंगे !
सिर्फ़ भाषण
ज़ीरो शासनGDP : Minus 23.9%
— Kapil Sibal (@KapilSibal) September 1, 2020
मोदी जी क्या आपको याद है :
अच्छे दिन
सब का साथ सब का विकास
आपने कांग्रेस को साठ साल दिये मुझे सिर्फ़ साठ महीने दो
पकोड़े तलने का वक्त आ गया है
वो भी नहीं बिकेंगे !
सिर्फ़ भाषण
ज़ीरो शासन
दर तीन महिन्यांनी देशाचा विकास दर जाहीर केला जातो. मागील अनेक वर्षांपासून हा प्रघात पडलेला आहे. आत्तापर्यंतची ही भारताची सर्वात खराब कामगिरी आहे. कोरोना, चिनी अतिक्रमण, कमी होणारी गुंतवणूक यामुळे देशापुढील आर्थिक संकट आणखी गडद होत चालले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेजही जाहीर केले आहे. मात्र, तरीही भारताचा विकासदर नकारात्मक झाला आहे. आशियायी देशांमध्ये भारताचा विकास दर सर्वात जास्त खराब आहे.
काय म्हणाले कपिल सिब्बल?
यावरून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना ट्विट करून प्रश्न विचारला आहे. 'जीडीपी उणे २३.९ टक्के. मोदींजी तुम्हाला आठवतयं का? 'अच्छे दिन', सब का साथ सबका विकास, तुम्ही काँग्रेला साठ वर्ष दिली मला फक्त ६० महिने द्या, आता पकोडे तळायची वेळ आली आहे, ते सुद्धा विकले जाणार नाहीत. फक्त भाषण आणि झिरो शासन' असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांचीही टीका
'जीडीपी २४ टक्क्यांनी घसरला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाणं खूप दुर्दैवी आहे' देशाच्या अर्थव्यवस्थेची बर्बादी नोटबंदीनंतर सुरू झाली. त्यानंतर सरकारने एका नंतर एक चुका केल्या, असे राहुल गांधी म्हणाले.