ETV Bharat / bharat

'कमलनाथांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही'

निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा 'स्टार' प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी आचारसंहितेचे सतत उल्लंघन केल्याचे म्हणत आयोगाने ही कारवाई केली.

दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह
author img

By

Published : Oct 31, 2020, 3:55 PM IST

नवी दिल्ली - स्टार प्रचारकांच्या यादीचे सर्वाधिकार राजकीय पक्षांनाच असतात, केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगानेच मार्गदर्शिकेचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही सिंह यांनी यावेळी केला. काँग्रेसचे स्टार प्रचारक कमलनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. कमलनाथ यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

  • स्टार प्रचारक की सूची का अधिकार राजनीतिक दलों का है, केंद्रीय चुनाव आयोग का नहीं है। उन्होंने अपनी गाइडलाइंस का उल्लंघन किया है: कमलनाथ को स्टार प्रचारक की सूची से हटाए जाने पर दिग्विजय सिंह, कांग्रेस pic.twitter.com/MA0lLrv8hT

    — ANI_HindiNews (@AHindinews) October 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा 'स्टार' प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी आचारसंहितेचे सतत उल्लंघन केल्याचे म्हणत आयोगाने ही कारवाई केली.

काय आहे प्रकरण?

राज्यातील डबरा मतदारसंघात एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना 'आयटम' म्हटले होते. या वक्तव्यानंतर कमलनाथ यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपाने या वक्तव्यावरून काँग्रेसची कोंडी केली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता. महिलांबाबत काँग्रेसची अशी मानसिकता असल्याचे मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते. तसेच निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

कमलनाथ यांची प्रतिक्रिया -

इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागणार नाही. माझे वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेण्यात आल्याचे कमलनाथ म्हणाले. राहुल गांधींनीही कमलनाथ यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.