नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जारी केली आहे. चौथ्या यादीत पक्षाने २७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर यादी जाहीर करण्यात आली.
The Congress Central Election Committee announces the fourth list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha. pic.twitter.com/yaRNLtdbPt
— Congress (@INCIndia) March 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Congress Central Election Committee announces the fourth list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha. pic.twitter.com/yaRNLtdbPt
— Congress (@INCIndia) March 16, 2019The Congress Central Election Committee announces the fourth list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha. pic.twitter.com/yaRNLtdbPt
— Congress (@INCIndia) March 16, 2019
अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तर प्रदेश आणि अंदमान निकोबार येथील जागांसाठी २७ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. शशी थरूर यांना तिरुवअनंतपूरममधून उमेदवारी मिळाली आहे.
दरम्यान, काल (शनिवारी) रात्री उशिरापर्यंत भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही हजर होते. यामुळे भाजप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.