ETV Bharat / bharat

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात, साक्षी महाराजांचा गंभीर आरोप

author img

By

Published : Jan 24, 2021, 4:54 PM IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी नवा वाद ओढवून घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

साक्षी महाराज
साक्षी महाराज

नवी दिल्ली - सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसने केली असा गंभीर आरोप भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केला. जाहीर सभेत भाषण करताना त्यांनी हा आरोप केला. काँग्रेसने सुभाषचंद्र बोस यांना ठार मारले. त्यांच्या लोकप्रियतेपुढे महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू उभे राहू शकत नव्हते, असे साक्षी महाराज म्हणाले.

साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. लोकप्रियतेसाठी सुभाष च्रंद बोस यांना अवेळीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं. सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू यांचा टिकाव नव्हता. त्यामुळेच काँग्रेसने त्यांची हत्या घडवून आणली, असा आरोप त्यांनी केला.

सुभाषचंद्र बोस यांनी 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा...' हा नारा दिला होता. इंग्रज एवढेही सरळ नव्हते की, स्वातंत्र्य मागितल्यावर त्यांनी दिलं असतं. म्हणून मी म्हणतो की, रक्त सांडवून आपण स्वातंत्र्य मिळवलं. यासाठी अनेक जण हुतात्मा झाले, असे साक्षी महाराज म्हणाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ -

दरवर्षी १८ ऑगस्टला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. याच दिवशी १९४५ साली नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, या अपघातातून ते वाचले असल्याचा विश्वास अनेकजण व्यक्त करतात. त्याच्या मृत्यूबद्दल अनेक सिद्धांत समोर आले आहेत. नेताजी संन्यासी होऊन उत्तर भारतात स्थायिक झाले. तर काहींना असे वाटते की, नेहरू आणि गांधी यांनी त्यांचा विश्वासघात केला आणि सोव्हिएत गुलागमध्ये तुरुंगात ठेवले. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस प्रत्यक्षात भारतात गुमनामी बाबा म्हणून वास्तव्य करीत होते, असही म्हटलं जात. गुमनामी बाबांची कहाणी एक रहस्य आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.