गोवा - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत, असे म्हणत काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
पक्षीय बलाबल
काँग्रेस १४
भाजप १३
गोवा फॉरवर्ड ३
मगो ३
अपक्ष ३
राष्ट्रवादी काँग्रेस १
मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता या दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. तर म्हापसाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाल्याने तेथील जागाही ३ रिक्त झाली आहे.