छतरपूर (मध्यप्रदेश)- जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जिल्ह्याच्या राजनगर भागांतर्गत कर्रीमध्ये ३० लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधली होती. या इमारतीची वापराविना दुरवस्था झाली आहे. सरकारी आदेश असूनही आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स येथे राहण्यासाठी आले नाहीत. ते येथे आलेही नाही आणि त्यांनी कधी या घरांचे दारही उघडले नाही. या इमारतीची देखरेख ठेवली नसल्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे.
![छतरपुर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3910979_chatarpur.jpg)