ETV Bharat / bharat

दिल्लीत 20 जणांची हकालपट्टी; लॉकडाऊनच्या काळात सेवेतून कमी केल्याने कर्मचाऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न - company fired 20 people

लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार नसल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यानंतरही दिल्लीतील एका कंपनीमधील 20 कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.

new delhi labour news
दिल्लीत 20 जणांची हकालपट्टी; लॉकडाऊनच्या काळात सेवेतून कमी केल्याने कर्मचाऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न
author img

By

Published : Apr 15, 2020, 7:48 PM IST

नवी दिल्ली- सध्या देश गंभीर महामारीचा सामना करत आहे. यावेळी कोणत्याही आस्थापनाच्या मालकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणाचेही पगार थांबण्यात येऊ नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केलंय. मात्र दिल्लीतील एका कंपनीने त्यांच्या 20 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.

दिल्लीत 20 जणांची हकालपट्टी; लॉकडाऊनच्या काळात सेवेतून कमी केल्याने कर्मचाऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न

२० जणांची हकालपट्टी

मॉडर्न लिव्हिंग हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (Modern Living Hospitality pvt.Ltd) नेहरू प्लसने 20 नोकरदारांना नोटीस देत त्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये काही कारणांचा समावेश करण्यात आलाय. दिल्लीतील रोहिणी अवंतिका परिसरात राहणाऱ्या प्रमोद सिंह रावत यांनी कंपनीने ऑफिसमध्ये न येण्याची नोटीस धाडल्याचे सांगितले. यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्व उभा राहिलाय. उत्तर प्रदेशातील बरेलीत वास्तव्य करणाऱ्या मोहम्मद हाशिम यांनी पंतप्रधानांना मदतीची हाक दिली आहे. त्यांनाही सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्याचससोबत नोएडामध्ये राहणारे विकल्प यादव यांनी कंपनीने सात दिवसांची नोटीस देऊन सेवेतून कमी केल्याचे सांगितले.

व्हिडियोमार्फत मदतीची मागणी

दिल्लीतील सरिता विहारमध्ये राहणाऱ्या मोहन सोनी यांनीदेखील त्यांना कंपनीतून काढून टाकल्याचे सांगितले. संबंधित कंपनीने आपत्तीच्या काळात कायमच अशा प्रकारचे अघोरी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.