चंदीगढ - हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. पक्षाकडून एकमेंकावर टीका होत आहेत. यातच एका प्रचार सभेला संबोधित करताना हरियाणा मुख्यमंत्री मनोहर लाला खट्टर यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सोनिया गांधी यांना मेलेली उंदरीण असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजिनामा दिल्यानंतर काँग्रेसने नविन पक्ष अध्यक्षाचा शोध सुरू केला. तीन महिन्याचा काळ गेल्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांना अध्यक्ष बनवले. पुन्हा तोच गांधी परिवार, म्हणजे शोधला डोंगर मिळाली उंदरीन ती पण मेलेली, असे खट्टर सभेत म्हणाले.
मनोहर लाल आपल्या पक्षाच्या महिला उमेदवार यांचा प्रचार करण्यासाठी गेले होते. यावेळी एका महिलेचा प्रचार करताना त्यांनी दुसऱ्या महिलेचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, असे काँग्रेसन म्हटले आहे. याप्रकरणी काँग्रेस दिल्लीमध्ये प्रदर्शन करणार आहे.