ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा - cm kamal nath press conference live

आज राज्यपालांना राजीनामा देणार असल्याची घोषणा कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेत केली. बहुमत चाचणीला सामोर जाण्याआधीच कमलनाथ यांनी राजीमाना देण्याची घोषणा केली.

कमलनाथ
कमलनाथ
author img

By

Published : Mar 20, 2020, 12:34 PM IST

Updated : Mar 20, 2020, 1:27 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशातील सत्तापेचानंतर काँग्रेस सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. भाजपला आमचा विकास पचला नाही, म्हणून त्यांनी आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. आमच सरकार यशस्वी बनेल याची भाजपला भीती होती म्हणून ते माझ्या सरकार विरोधात षडयंत्र रचत राहील्याचेही कमलनाथ म्हणाले.

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकार स्थापनेचा दावा याआधीच केला आहे. तर बहुमत नसल्याचे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कबूल केले आहे. मी राज्यामध्ये जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले मात्र, भाजपला ते पचले नाही. आमचे सरकार पाडण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. असे कमलनाथ म्हणाले.

आज(शुक्रवारी) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. १६ आमदारांचे राजीनामे स्वीकारले नसल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने प्रश्चचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आज राजीनामे स्वीकारण्यात आले. हात उंचावून बहुमत चाचणी घेण्यात येणार होती. बहुमत चाचणीचे चित्रिकरण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र,आता कमलनाथ सरकार कोसळले आहे.

भाजपने लोकशाहीचा गळा घोटला

  • भाजपला आमचा विकास पचला नाही, म्हणून आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न
  • आज राज्यपालांना राजीनामा देणार
  • आमच सरकार यशस्वी बनेल याची भाजपला भीती होती
  • १७ डिसेंबर २०१८ ला मुख्यंमत्री पदाची शपथ घेतली.
  • राज्याला नवी दिशी देण्याचा १५ महिन्यांच्या कार्यकाळात प्रयत्न केला
  • फक्त राज्याच्या विकासावर विश्वास ठेवले. केंद्रात मंत्री असताना राज्याला मदत करण्याचा प्रयत्न केला.
  • ५ वर्षांची संधी मिळाली होती.
  • भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेशाील सत्तेत १५ वर्ष मिळाली, मात्र, माफिया राज फोफावले
  • भाजप माझ्या सरकार विरोधात कट रचत राहीला
  • १५ किंवा महिनाभराची सत्ता असल्याचे भाजप कायम म्हणत राहीला आणि आपले षडयंत्र माझ्याविरोधात रचले
  • २२ आमदारांना कर्नाटकात भाजपने ओलिस ठेवले, हे सर्वांना माहिती आहे.
  • भाजपने लोकशाहीची हत्या केली. जनता माफ करणार नाही
  • राज्याचा विकास होईल, त्यामुळे भाजपने माझ्या सरकराला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला
  • १५ लाख शेतकऱ्याचे कर्ज माफ केले. तर ७ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
  • भाजपने शेतकऱ्यांबरोबर धोका केला
  • भाजपच्या काळात माफियाराज फोफावले
  • भाजपच्या काळात वाढलेली बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला.
  • १ हजार गोशाळा बनवण्याचा निर्णय घेतला तो भाजपला पचला नाही.
  • १५ महिन्यात चारशे घोषणा पूर्ण केल्या
  • १५ महिन्यात सतत काम केले, कोणतेही भष्टाचाराचे आरोप झाले नाही
  • विकासाच्या मार्गावर आम्ही कायम राहू, लोकांचा विश्वास आमच्या बरोबर
  • भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही

मध्य प्रदेश विधानसभेमधील सध्याचे गणित?

मध्य प्रदेश विधानसभेतील 230 पैकी 2 आमदारांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. 228 जागांपैकी 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर 206 जागा शिल्लक आहेत. अशावेळी बहुमत सिद्ध करण्याचा आकडा 104 होतो. कॉंग्रेसकडे आधी 114 आमदार होते. मात्र आता सभापतींसह 92 आमदार आहेत. सपा, बसप आणि अपक्ष आमदार धरता हा आकडा केवळ 99 पर्यंत पोहोचतो. तर भाजपकडे 107 आमदार आहेत. अशा परिस्थितीत भाजपा सध्याच्या संख्याबळाच्या जोरावर सरकार बनवू शकते.

Last Updated : Mar 20, 2020, 1:27 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.