ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता;मुख्यमंत्र्यांची माहिती - लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आणि लोकांनी दिलेल्या सूचनेनुसार लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितले.

cm-jairam-thakur-on-extension-of-lockdown-period-in-himachal
हिमाचल प्रदेशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता;मुख्यमंत्र्यांची माहिती
author img

By

Published : Apr 11, 2020, 11:26 AM IST

शिमला- मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लोकांनी दिलेल्या सूचनेनुसार लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, असे सांगितले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढेल असे वाटले नव्हते पण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या सीमा बंद ठेवण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील स्थितीबद्दल माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या सूचना आणि राज्यातील अधिकाऱ्यासोबत चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन वाढवण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.