ETV Bharat / bharat

'देशात 'भारत माता की जय' म्हणणारा राहील; वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाईची वेळ' - भारत में भारत माता की जय बोलने वाला रहेगा

दिल्लीतील हिंसाचारावर सत्ताधारी भाजपकडून विरोधकांवर टीका करण्यात येत असून हा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. शाहंच्या विरोधात बोलणारे आणि विनाकारण वातावरण बिघडवणाऱ्यांच्या विरोधात आता सक्तीने कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर
author img

By

Published : Feb 25, 2020, 8:52 PM IST

शिमला - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दिल्लीमध्ये सीएए, एनआरसीसंबधी हिंसाचार उफाळला आहे. सत्ताधारी भाजपकडून विरोधकांवर टीका करण्यात येत असून हा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लक्ष ठेवून आहेत. देशाच्या विरोधात बोलणारे आणि विनाकारण वातावरण बिघडवणाऱ्यांच्या विरोधात आता सक्तीने कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर

भारतात भारत माता की जय म्हणणारा राहील आणि जो असे बोलणार नाही, जे भारताचा विरोध करतील, संवैधानिक व्यवस्थेवर वारंवार हल्ले चढवणाऱ्यांचा आता विचार करण्याची गरज आहे, असे ठाकूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, दिल्लीच्या भडनपुरा आणि मौजपूरमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये दंगल झाल्याने आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात.. दिल्लीतील हिंसाचाराविषयी ऐकले, पण आमची चर्चा झाली नाही

दिल्लीमध्ये हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून १० जणांचा बळी गेला आहे. १३० नागरिक आणि ५६ पोलीस यात जखमी झाले आहेत. लोकांनी पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन डीसीपी मंदीप सिंह रंधावा यांनी केले आहे. लोकांनी अनेक घरांवर दगडफेक केली, हिंसाचार झालेल्या ठिकाणांवर मोठ्या संख्यने पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पुढील महिनाभर १४४ कलम लागू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल आणि अमित शाह यांचीदेखील बैठक झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.