चामोली - उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरूच असून सोमवारी चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरेच लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोध घेतला जात आहे.
चमोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ढगफुटी होऊन घाट बाजार येथील चुफलागाड नदीला पूर आला. या पुरात चार दुकाने वाहून गेली आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच विकासखंड घाटातील लांखी या गावात नदीला पूर आल्याने यात नदीकाठचे घर नदीत कोसळले आहे. या घराच्या ढिगाऱ्याखाली एक महिला आणि एक मुलगी दबली गेली. बचाव पथकाला महिलेचा मृतदेह मिळाला असून मुलगी अद्याप बेपत्ता आहे. याचबरोबर आणखी एका गावात घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.