ETV Bharat / bharat

नागरिकत्व सुधारणा विधेयक : शिरीन दळवी यांनी परत केला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार! - राज्य साहित्य अकादमी पुरस्कार वापस

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा आपल्या राज्यघटनेवर, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे मी खूप दुःखी असून दुरुस्ती विधेयक देशामध्ये फूट पाडणारे आहे. याचा निषेध म्हणून मी हा पुरस्कार परत करत आहे, असे शिरीन दळवी म्हणाल्या.

award wapsi shireen dalvi
शिरीन दळवी यांनी परत केला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार!
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:32 PM IST

ठाणे - लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेमध्ये देखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) मंजूर झाले. विधेयकाविरोधात हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. उर्दू पत्रकार आणि साहित्यिका शिरीन दळवी यांनी राज्य साहित्य अकादमी पुरस्कार केला आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक : शिरीन दळवी यांनी परत केला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार!

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याची घोषणा करताना शिरीन दळवी यांनी सांगितले, 'भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुःखी आहे. हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. या अमानवीय विधेयकाचा निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे विधेयक आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या माझ्या समुदाय आणि सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत आहे.' गंगा जमुनी तहजीब आणि संविधान जपण्यासाठी आपल्याला ठाम राहावेच लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

शिरीन दळवी या लखनऊ येथील प्रसिद्ध उर्दू दैनिक 'अवधनामा'च्या मुंबई आवृत्तीच्या माजी संपादक आहेत. राज्य सरकारकडून त्यांना 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. 2014 मध्ये फ्रेंच मॅगझीन 'शार्ली हेब्दो'ने मोहंमद पैगंबर यांचा वादग्रस्त कार्टून प्रसिद्ध केला होता. तो कार्टून शिरीन यांनी आपल्या दैनिकांत प्रसिद्ध केला होता. या प्रकरणामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचा : स्वाती मालिवाल यांच्या उपोषणाचा दहावा दिवस; आप आमदाराने राज्यसभेत उठवला मुद्दा

Intro:नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उर्दू साहित्यिक यांचा पुरस्कार परतBody:प्रसिद्ध उर्दू पत्रकार आणि साहित्यक शिरीन दळवी आपला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. लोकसभेनंतर बुधवारी त्याला राज्यसभेने देखील मंजुरी दिली. त्याचाच निषेध व्यक्त करताना त्यांनी हा निर्णय घेतलाय... नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा आपल्या राज्यघटनेवर, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे असं त्यांच म्हणणं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक गंगा जमुनी तहजीब विरोधात -शिरीन साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याची घोषणा करताना शिरीन दळवी यांनी सांगितले, "भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुखी आहे. हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. याच अमानवीय विधेयकाचा निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा करतेये. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे विधेयक आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या माझ्या समुदाय आणि सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करतेये... गंगा जमुनी तहजीब आणि संविधान जपण्यासाठी आपल्याला ठाम राहावेच लागेल." असेही त्या पुढे म्हणाल्या.
Byte शिरीन दळवी साहित्यिकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.