नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात पश्चिम बंगालमधील 5 मजूरांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावे, अशी विनंती त्यांनी पत्रामध्ये केली आहे.
-
AR Chowdhary, Congress writes to PM Modi in connection with the death of 5 labours from Murshidabad, who were killed by terrorists in Kulgam (J&K), yesterday. The letter states 'I urge your office further to extend financial support to victims' families from your relief fund.' pic.twitter.com/BVT5ZoA6eF
— ANI (@ANI) October 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AR Chowdhary, Congress writes to PM Modi in connection with the death of 5 labours from Murshidabad, who were killed by terrorists in Kulgam (J&K), yesterday. The letter states 'I urge your office further to extend financial support to victims' families from your relief fund.' pic.twitter.com/BVT5ZoA6eF
— ANI (@ANI) October 30, 2019AR Chowdhary, Congress writes to PM Modi in connection with the death of 5 labours from Murshidabad, who were killed by terrorists in Kulgam (J&K), yesterday. The letter states 'I urge your office further to extend financial support to victims' families from your relief fund.' pic.twitter.com/BVT5ZoA6eF
— ANI (@ANI) October 30, 2019
काश्मीरमधील कुलगाममध्ये मंगळवारी बंगालमधील पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावे. याचबरोबर मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी विनंती चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू
दरम्यान चौधरी यांनी बुधवारी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी काश्मीरमधील सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. विरोधी पक्ष काश्मीरमधील परिस्थितीवर सतत प्रश्न विचारत असतात पण केंद्र सरकार गांभीर्य दाखवत नाही. काँग्रेसने यापूर्वीही सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे पाठवावे असे सांगितले होते परंतु मोदींना त्याकडे लक्ष दिले नाही, असे ते म्हणाले.