नवी दिल्ली - चीन कोरोना विषाणूविरोधात लढा देत आहे, आणि परिस्थिती ताब्यात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे अशा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्यक्त केला. ते दिल्लीमध्ये भारतीय उद्योजकांशी संवाद साधत होते.
चीन कोरोनाला लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी याबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात येताना दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
मी जिंकल्यानंतर उद्योगांना गती मिळेल..
अमेरिकेत होणारी पुढील अध्यक्षीय निवडणूक आपण जिंकूच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, आपण जिंकल्यानंतर उद्योगांनाही गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सरकारने अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आणि लष्करासाठी बरेच काही केले असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील बरेचसे निर्बंध हटवणार..
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी म्हणून, अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी असलेले बरेचसे निर्बंध आपण हटवणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
यावेळी ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी बरेच मोठमोठे उद्योजक उपस्थित होते. यामध्ये रिलायन्सचे मुकेश अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांचाही समावेश होता.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचार LIVE : मृतांची संख्या १३, गाझियाबादकडे जाणारे सर्व रस्ते केले बंद..