ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याची पुन्हा मोर्चेबांधणी

चीनने पँगाँग सरोवराच्या उत्तरेला सैन्याची आणि लष्करी सामग्रीची जमवाजमव सुरू केली आहे. ७ सप्टेंबरला रात्री भारताने ताबा घेतलेल्या पहाडी भागावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चिनी सैन्यांनी केला. मात्र, भारतीय लष्कारने चिनी सैन्याला मागे जाण्याचा इशारा दिला. मात्र, मागे जातेवेळी चिनी सैन्याने गोळीबार केला.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 9, 2020, 5:12 PM IST

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला चिनी घुसखोरीला रोखण्यासाठी भारतीय सैन्याने मोक्याच्या ठिकाणांवर कब्जा मिळविला आहे. यानंतर भारतीय लष्कराला मागे ढकलण्यासाठी चिनी लष्कराकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, भारतीय लष्कारने संयमी भूमिका घेत चिनी सैन्याला पुढे येण्यापासून रोखले आहे. यावेळी चीनने गोळीबारही केला होता. आता चीनने पँगाँग सरोवराच्या उत्तरेला सैन्याची आणि लष्करी सामग्रीची जमवाजमव सुरू केली आहे.

मागील चार महिन्यांपासून भारत चीनमध्ये पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर वाद सुरू आहे. चीनने आक्रमक भूमिका घेत गलवान खोऱ्यातील पहाडी भागात कब्जा मिळविला आहे. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवानही शहीद झाले. त्यानंतर वातावरण आणखीनच तापले. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी लष्कराने पँगाँग लेकच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने आधीच पावले उचलत महत्त्वाच्या पहाडी ठिकाणांवर ताबा मिळवला.

भारताने ७ सप्टेंबरला रात्री ताबा घेतलेल्या पहाडी भागावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चिनी सैन्यांनी केला. मात्र, भारतीय लष्कारने चिनी सैन्य मागे जाण्याचा इशारा दिला. मात्र, मागे जातेवेळी चिनी सैन्याने गोळीबार केला. या घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनला द्विपक्षीय करारांचे पालन करण्याचा तसेच सीमेवर शांतता बाळगण्याचे आवाहन केले.

दोन्ही देशांनी सीमेवर रणगाडे, शस्त्रसाठा आणि दारुगोळा जमा केला आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्णाण झाली आहे. सीमेवरील परिस्थिती अत्यंत तणापूर्ण असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच म्हटले आहे. लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, अजूनही चर्चा सुरूच आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने असून फायरिंग रेंजमध्ये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.