नवी दिल्ली -देशाला जुनाट मानसिकतेतून बाहेर काढणारे भारताचे माजी पंतप्रधान पी. नरसिंहराव यांच्या नावे देशात विद्यापीठ असावे, असा विचार माजी अर्थमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मांडला आहे. आज(रविवार) माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंहाराव यांची जयंती आहे. 28 जून 1921 रोजी पी. व्ही नरसिंहा राव यांचा जन्म झाला होता.
नरसिंहा राव यांचे नाव एखाद्या नव्या किंवा जुन्या विद्यापीठाला द्यायला हवे. या विद्यापीठात नरसिंहराव यांचे आवडते विषय राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र शिकवण्यात यावेत. या विषयांमध्ये राव पारंगत होते. राव यांनी भारताला जुनाट मानसिकतेतून बाहेर काढत विकास आणि स्वावलंबनाच्या मार्गावर आणले, असे चिदंबरम म्हणाले.
राव यांचे मित्र, शत्रू आणि टीकाकार त्यांनी भारतासाठी दिलेले योगदान नाकारु शकत नाहीत. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा सरकारने त्यांचे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करायला हवे, असे चिदंबरम म्हणाले. पंतप्रधान मोदींनीही राव यांना आज आदरांजली वाहिली. राव यांनी अन्यायाच्या विरुद्ध कायम आजाव उठवला, तसेच देशाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले, असे मोदी म्हणाले.