ETV Bharat / bharat

सर्व कुटुंबाला संपवून २२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट.. - बिलासपूर तरुण कुटुंबीय हत्या

रोशन सूर्यवंशी असे या तरुणाचे नाव आहे. तो मानसिकरित्या अस्थिर होता. गुरुवारी रात्री त्याने आपले वडील रुपदास (४५), आई संतोषी बाई (४०), बहीण कामिनी (१८) आणि दोन भाऊ रोहित (२०), ऋषी (१५) यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर त्याने बाहेर जात एका अज्ञात भरधाव वाहनाखाली आपला जीव दिला.

Chhattisgarh: Man kills 5 family members, commits suicide in Bilaspur
सर्व कुटुंबाला संपवून २२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट..
author img

By

Published : Jul 24, 2020, 3:55 PM IST

रायपूर : एका २२ वर्षीय युवकाने आपल्या सर्व कुटुंबीयांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील मातियारी गावात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन सूर्यवंशी असे या तरुणाचे नाव आहे. तो मानसिकरित्या अस्थिर होता. गुरुवारी रात्री त्याने आपले वडील रुपदास (४५), आई संतोषी बाई (४०), बहीण कामिनी (१८) आणि दोन भाऊ रोहित (२०), ऋषी (१५) यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर त्याने बाहेर जात एका अज्ञात भरधाव वाहनाखाली आपला जीव दिला.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : काश्मिरात 4 जी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यास परिस्थिती योग्य नाही - गृह मंत्रालय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.