रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रायपूरच्या जवळ असणाऱ्या एका रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची स्थिती गंभीर असल्याचेही सांगितले जात आहे.
जोगींची प्रकृती गंभीरच, दिल्लीला पाठवण्याची शक्यता..
अजित जोगींना कार्डिअॅक अरेस्ट आल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली असल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले आहे. त्यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके जवळपास बंद पडले होते, आता त्यांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असली, तरी त्यांची प्रकृती नाजुक असल्याचेही संचालक सुनील खेमका यांनी सांगितले.
चिंचेच्या 'बी'मुळे थांबला श्वास..
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगी हे घरी चिंचा खात असताना, चिंचेचे बी त्यांच्या घशात अडकले. त्यामुळे त्यांचा श्वास थांबला गेला. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.