पाटणा - केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद हेलिकॉप्टर अपघातातून आज(शनिवार) थोडक्यात बचावले. ते प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा पंखा तारांना लागल्याने अपघात झाला. रविशंकर प्रसाद यांच्यासोबत बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे देखील होते. दोन्ही नेते सुरक्षित आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविशंकर प्रसाद बिहारला आले असता पाटणा विमानतळावर त्यांच्या हॅलिकॉप्टरचा पंखा तारेला लागला. त्यामुळे पंखा तुटला. या अपघातातून दोन्ही नेते थोडक्यात बचावले. दोघेही सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.