भुवनेश्वर - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज प्लाझ्मा दान केला आहे. प्रधान यांना कोरोनाची लागण झाली होती. ते आता कोरोनातून बरे झाले असून त्यांनी इतर कोरोना रुग्णांच्या सोईच्यादृष्टीने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.
कटकच्या एससीबी मेडिकल महाविद्यालय वैद्यकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी आपला प्लाझ्मा दिला. प्लाझ्मा दान केल्यानंतर प्रधान यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. प्लाझ्मा दान केल्यानंतर मला आनंद होत आहे. कोरोनाशी झुंझ देत असलेल्यांसाठी याचा उपयोग होईल, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्याची विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.
-
Urge all #Covid-19 recovered people to come forward and donate plasma to aid the treatment of #Covid-19 patients and help defeat the novel coronavirus. pic.twitter.com/RDdGlFpT38
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Urge all #Covid-19 recovered people to come forward and donate plasma to aid the treatment of #Covid-19 patients and help defeat the novel coronavirus. pic.twitter.com/RDdGlFpT38
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 3, 2020Urge all #Covid-19 recovered people to come forward and donate plasma to aid the treatment of #Covid-19 patients and help defeat the novel coronavirus. pic.twitter.com/RDdGlFpT38
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 3, 2020
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात सातत्याने वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या प्लाझ्मा दान करत आहेत. त्याचा इतर गंभीर कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपयोग होत आहे. विविध स्तरावरून कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा - हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मागणी