ETV Bharat / bharat

मागील ५ वर्षात ९६३ दहशतवादी ठार; ३९८ घुसखोरीच्या घटना - अमित शाह - केंद्रीय गृहमंत्री

दहशतवाद्यांविरोधात लढताना भारतीय सैन्याच्या ४१३ जवानांना वीरमरण आले आहे. दहशतवादाविरोधात केंद्र सरकार झीरो टॉलेरन्स नीतीचा वापर करत आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Jul 16, 2019, 9:18 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये मागील ५ वर्षात ९६३ दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले. तर, २०१६ ते २०१८ यादरम्यान सीमेवर घुसखोरी करताना १२६ घुसखोरांना ठार करण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मंगळवारी मागील ५ वर्षात झालेल्या दहशतवादी कारवायांबद्दल लोकसभेत माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत लिखित उत्तर देताना सांगितले, दहशतवाद्यांविरोधात लढताना भारतीय सैन्याच्या ४१३ जवानांना वीरमरण आले आहे. दहशतवादाविरोधात केंद्र सरकार झीरो टॉलेरन्स नीतीचा वापर करत आहे. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांविरोधात सक्रिय कारवाई करत आहेत.

जी. किशन रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले, २०१६ साली सीमेवरुन १११९ घुसखोरीच्या घटना घडल्या. २०१७ साली १३६ आणि २०१८ साली १४३ वेळा घुसखोरी करण्यात आली. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न विफल करताना ४ दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.