नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये 15 डिसेंबरला झालेल्या हिंसेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिल्ली पोलीस ग्रंथालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संबधीत व्हिडिओ जामिया समन्वय समितीने जारी केला आहे.
-
Exclusive CCTV Footage of Police Brutality in Old Reading Hall, First floor-M.A/M.Phill Section on
— Jamia Coordination Committee (@Jamia_JCC) February 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
15/12/2019
Shame on you @DelhiPolice @ndtvindia @ttindia @tehseenp @RanaAyyub @Mdzeeshanayyub @ReallySwara @ANI @CNN @ReutersIndia @AltNews @BBCHindi @the_hindu @TheQuint @BDUTT pic.twitter.com/q2Z9Xq7lxv
">Exclusive CCTV Footage of Police Brutality in Old Reading Hall, First floor-M.A/M.Phill Section on
— Jamia Coordination Committee (@Jamia_JCC) February 15, 2020
15/12/2019
Shame on you @DelhiPolice @ndtvindia @ttindia @tehseenp @RanaAyyub @Mdzeeshanayyub @ReallySwara @ANI @CNN @ReutersIndia @AltNews @BBCHindi @the_hindu @TheQuint @BDUTT pic.twitter.com/q2Z9Xq7lxvExclusive CCTV Footage of Police Brutality in Old Reading Hall, First floor-M.A/M.Phill Section on
— Jamia Coordination Committee (@Jamia_JCC) February 15, 2020
15/12/2019
Shame on you @DelhiPolice @ndtvindia @ttindia @tehseenp @RanaAyyub @Mdzeeshanayyub @ReallySwara @ANI @CNN @ReutersIndia @AltNews @BBCHindi @the_hindu @TheQuint @BDUTT pic.twitter.com/q2Z9Xq7lxv
15 डिसेंबरला विद्यापीठामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधामध्ये आंदोलन सुरु होते. यावेळी पोलीसांनी जामियामधील विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. विद्यार्थी ग्रंथालयामध्ये शांतपणे वाचन करत आहेत. यावेळी पोलीस तिथे येतात आणि विद्यार्थ्यांना अमानूष मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना पोलीस मारहाण करत असून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तक असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
काय झालं होत 15 डिसेंबरला ?
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात 15 डिसेंबरला सीएएविरोधी आंदोलन सुरु होते. त्यावेळी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली. पोलिसांनी विनापरवानगी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटना केला होता. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. विद्यापीठातील आंदोलनानंतर देशभरात त्याचे प्रतिसाद उमटले होते.