हैदराबाद - लिंगमपल्ली-फलकनुमा इंटरसिटी ट्रेन आणि कुर्नूल सिटी-सिकंदराबाद हंड्री एक्सप्रेसची काचीगुडा रेल्वे स्थानकाजवळ जोरदार धडक झाली. यात १२ प्रवासी गंभीर जखमी झाले. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वेगाने येणाऱ्या इंटरसिटी ट्रेनचे २ डबे धडक झाल्यानंतर अक्षरशः हवेत उडाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. धडक झाल्यानंतर फारसे जखमी न झालेले प्रवासी ट्रेनमधून उतरून भीतीने दूर पळत असल्याचेही या फुटेजमध्ये दिसत आहे. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही रेल्वे गाड्यांचे डब्बे चांगलेच चेपले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.