ETV Bharat / bharat

हल्ल्याला मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही - अरुण जेटली

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक संपली आहे. या बैठकीला राजनाथ सिंग, निर्मला सितारमण, पियूष गोयल, सुषमा स्वराज आणि इतरही वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित.

कॅबिनेट बैठक
author img

By

Published : Feb 15, 2019, 9:32 AM IST

Updated : Feb 15, 2019, 12:52 PM IST

नवी दिल्ली - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीर घेण्यात आलेली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) बैठक संपली आहे.या हल्ल्याला मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली म्हटले आहे. त्याबरोबरच भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेव्हर्ड' नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय या बैठकी दरम्यान घेतलाचेही ते म्हणाले.

या बैठकीत जम्मू काश्मीर आणि देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली आहे. पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक झाली असून या बैठकीला राजनाथ सिंग, निर्मला सितारमण, पियूष गोयल, सुषमा स्वराज आणि इतरही वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढून ४३ वर पोहोचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे १२ सदस्य या घटनेचा तपास करण्यासाठी आज जम्मू-काश्मीरात जाणार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दुपारी ३.१५ च्या सुमारास आत्मघातकी हल्ला झाला. आधी आयईडी स्फोट झाल्याचे वृत्त होते. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याचेही समोर आले. मात्र, आता हा आत्मघातकी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. एका स्थानिक वृत्त संस्थेला जैशच्या प्रवक्त्याने फोन करुन याची माहिती दिली. परंतु, अद्याप प्रवक्त्याची ओळख पटलेली नाही.

undefined

Intro:Body:

पुलवामा हल्ला: थोड्याच वेळात सुरू होणार कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक

नवी दिल्ली - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षेविषयी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बैठक सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुरू होणार आहे.

या बैठकीत जम्मू काश्मीर आणि देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात येणार आहे. पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक होणार असून या बैठकीला राजनाथ सिंग, निर्मला सितारमन, पियूष गोयल, सुषमा स्वराज आणि इतरही वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढून ४३ वर पोहोचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे १२ सदस्य या घटनेचा तपास करण्यासाठी आज जम्मू-काश्मीरात जाणार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दुपारी ३.१५ च्या सुमारास आत्मघातकी हल्ला झाला. आधी आयईडी स्फोट झाल्याचे वृत्त होते. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याचेही समोर आले. मात्र, आता हा आत्मघातकी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. एका स्थानिक वृत्त संस्थेला जैशच्या प्रवक्त्याने फोन करून याची माहिती दिली. परंतु, अद्याप प्रवक्त्याची ओळख पटलेली नाही.

Conclusion:
Last Updated : Feb 15, 2019, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.