नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून तसेच डिजिलॉकरमधूनही आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या तारखेची माहिती दिली होती. निशंक त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल बुधवारी (ता. १५) जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.
सीबीएसई परिक्षेत पुणे विभागाचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे. तर या यादीत त्रिवेंद्रम ९९.२८ टक्केसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
-
Central Board of Secondary Education (CBSE) Class 10 exam results announced. Overall Pass Percentage is 91.46% pic.twitter.com/NYi63iBY85
— ANI (@ANI) July 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Central Board of Secondary Education (CBSE) Class 10 exam results announced. Overall Pass Percentage is 91.46% pic.twitter.com/NYi63iBY85
— ANI (@ANI) July 15, 2020Central Board of Secondary Education (CBSE) Class 10 exam results announced. Overall Pass Percentage is 91.46% pic.twitter.com/NYi63iBY85
— ANI (@ANI) July 15, 2020
दरम्यान, सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यात मुलींनी बाजी मारली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेच्या निकाल ८८.७८ टक्के इतका लागला. मागील वर्षाच्या (२०१९) तुलनेत ही आकडेवारी जास्त आहे. २०१९ मध्ये ८३.४० टक्के विद्यार्थी पास झाले होते. सीबीएसई कोरोना विषाणूच्या फैलावामुळे यंदाच्या वर्षी मेरीट सूची जाहीर करणार नाही.
हेही वाचा - राम जन्मभूमी हे बौद्ध स्थळ.. बौद्ध भिक्खूंचे अयोध्येमध्ये आंदोलन
हेही वाचा - सचिन पायलट यांनी काँग्रेस सोडणे दुःखदायक; शशी थरूर यांचे मत